Apr 21
0 Comments

आप्रोस - वर्जिन कोकोनट ऑइल (VCO)

नारळाचे ओले खोबरे न सुकवता, त्यावर कुठलिही रासायनिक प्रक्रीया न करता, तापमानातदेखील काही बदल न करता जे तेल नारळाच्या दुधातून केवळ घुसळून वेगळे करतात त्याला ‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ म्हणतात. हे जगात उपलब्ध तेलांमधील सर्वात शु्द्ध तेल गणले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने व्हिसीओ काढल्यास त्यात “लॉरीक ऍसीड” नावाचा घटक मुबलक प्रमाणात आढळतो जो नारळाच्या दुधाव्यतिरीक्त केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळतो जो अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व सर्वांगीण वाढ करण्यात मुख्य भुमिका निभावतो.

व्हिसीओ वर जगभरात संशोधन झाले आहे आणि त्याचे निष्कर्ष अदभूत आणि आश्चर्यकारक आहेत. अल्झायमर व पार्कीन्सन सारख्या दुर्धर आणि अपरिवर्तनीय (irreversible) आजारात व्हिसीओ ने खूप आश्वासक परीणाम दाखवले आहेत. अमेरीकन व युरोपिअन डॉक्टरांनी अल्झायमर व पार्कीन्सन रुग्णांवर अनेक प्रयोग केले व सप्रमाण सिद्ध केले की अशा प्रकारच्या असाध्य आजारांवर व्हर्जिन कोकोनट ऑइल अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहे. ह्याचे अनेक क्लिनिकल ट्रायल्स व अनेक अधिकृत वैज्ञानिक संस्थांचे संदर्भ ऑनलाइन उपलब्ध आहेत.

सर्वाधीक “जिरण-क्षमता” असलेले व्हिसीओ त्वचेतून सहजरित्या शरीरात प्रवेश करते व अस्थिमज्जांपर्यंत पोहोचून मूलागामी परीणाम साधू शकते. वर वर्णन केलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने काढलेले व्हिसीओ तोंडावाटे प्राशन करता येते जे मेंदूमधील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून स्मरणशक्ती वाढवण्यास व वयानुसार झालेली बौद्धीक झीज भरून काढण्यात प्रभावी भुमिका निभावते. तोंडावाटे प्राशन केलेले व्हिसीओ शरीरात देखील अँटिऑक्सिडेंटची पातळी वाढवते ज्यामुळे वयानुसार झालेली शरीराची जर्जरता कमी होते.

फॉरेस्टफ्रेश नॅचरल्स सादर करत असलेले आप्रोस व्हिसीओ देखील अशा प्रकारे नारळाचे दूध “केवळ वेगात घुसळून (१८,000 RPM)” १००% शास्त्रोक्त पद्धतीने काढले जाते व कुठल्याही रासायनिक व/वा तापमानाचा अंतर्भाव नाही. ह्यामधे टिकवण क्षमतेसाठी कुठल्याही प्रिझर्वेटीव्हचा वापर केला जात नाही.

आर्द्रता विरहीत व्हिसीओ ची नैसर्गिक टिकवणक्षमता २ वर्षाची असते. अशा प्रकारे तयार केलेले व्हिसीओ केवळ मसाज किंवा डोक्यावर घालण्यापेक्षा प्रत्यक्ष प्राशन केल्यास अधिक उत्तम परीणाम देते. व्हिसीओ बनवण्याच्या अनेक पद्धती व त्यांचे शास्त्रीय परीणाम ह्याचा सखोल अभ्यास करून सर्वोत्तम पद्धतीने बनवलेले हे “आप्रोस व्हिसीओ” अत्यंत आश्वासक परीणाम देईल ह्याची खात्री आहे!

व्हिसीओमधे ५०% पेक्षा अधिक आढळणाऱ्या “लॉरिक ऍसिड”मुळे नवजात बालकांची रोगप्रतिकार शक्ति वाढते व विषाणूजन्य संसर्गापासून रक्षण करते ह्यामुळे हे अर्भकांसाठी सर्वोत्तम मसाज तेल आहे. व्हिसीओ बॅक्टेरिया , व्हायरस, बुरशी अशा तिन्ही प्रकारच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालून इतर कुठल्याही तेलापेक्षा त्वचा विकारांवर अधिक परीणाम साधते.

शिवाय त्वचा कोरडी पडणे, eczema ,सोरायसिस, पिंपल्स, dermatitis या सर्वांवर व्हिसीओ खात्रिशीर उपाय आहे. व्हिसीओ एक अप्रतिम मॉइश्चराइझर, फेस क्लीझनर व सनस्क्रीन लोशन असे ३ इन १ प्रॉडक्ट आहे.

एका मान्यताप्राप्त रिसर्च नुसार VCO २०% हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांना अडवते. व्हिसीओमधील अँटीऑक्सिडंट मुळे शरीराची एजिंग प्रोसेस स्लो होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

व्हिसीओ दातांची कीड थांबवणे आणि हिरड्यांची निगा राखते. व्हिसीओ गुड HDL कोलेस्ट्रेरॉल वाढवते आणि बॅड LDL कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करते.

अशाप्रकारे विविध गुणसंपन्न अशा “आप्रोस व्हिसीओ” विषयक तुम्हाला अधिका माहिती हवी असल्यास आपल्या शंका, प्रश्न आम्हाला पाठवा व आपल्याला “आप्रोस व्हिसीओ” ट्राय करायला आवडेल का हे देखील आम्हाला नक्की कळवा.

आप्रोस - कोंकणातील ओल्या शुद्ध नारळाच्या दुधापासून काढलेले एक उत्कृष्ट औषधी व्हर्जिन तेल!

सेंट्रीफ्यूज पद्धतीने ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले “आप्रोस” हे 100% शुद्ध ओल्या खोबऱ्याचे तेल आहे.

घुसळून दुधातून मलई (fat) वेगळे करण्याची ही एक पारंपारिक प्रक्रीया आहे. कोणतीही रासायनीक प्रक्रीया किंवा उष्णता देखील वापरली जात नाही. ह्यामुळे नारळाच्या दुधातील सर्व पोषण आणि चांगुलपणा तेलामध्ये जसे आहे तसे मिळते.

बाजारात उपलब्ध कोल्ड-प्रेस्ड व्हीसीओ ओव्हनमध्ये वाळवलेल्या नारळापासून किंवा खोबऱ्यापासून बनवले जाते. ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले आप्रोस व्हीसीओ हे एकमेव १००% शुद्ध आणि लॉरिक ऍसिड, पॉलीफेनॉल आणि केटोन्स “बायोएक्टिव्ह” असलेले सर्वोत्तम औषधी तेल आहे. हा फरक जाणून घ्या!

आप्रोस मध्ये “बायोएक्टिव्ह लॉरिक ऍसिड” असते ( ५०% ), जे अन्यथा फक्त आईच्या दुधात आढळते ( ६२% ) आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

VCO ची आंतरराष्ट्रीय स्तरावर “मदर ऑफ ऑइल” म्हणून ख्याती आहे. अत्यंत हलके वजन असल्याने, VCO त्वचेत किंवा टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव देते. हे “सर्वोत्तम नैसर्गिक औषधी तेल” मानले जाते.

  • आप्रोस व्हीसीओ आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि अँटी-ऑक्सिडंट्स नी समृद्ध आहे. हे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज थांबवते, तारूण्य प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. यात एमसीटी असतात जे केटोन्सनी समृद्ध असतात. हे न्यूरॉन्सचा ऱ्हास रोखतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. अल्झायमर आणि पार्किन्सन्सवर VCO चे परिणाम खूप आशादायक आहेत.

  • “आप्रोस” चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हानीकारन कोलेस्ट्रॉल कमी करते. सॉफ्टवेअर डेव्हलपर, मार्केटींग, विक्री आणि मॅनेजमेंट यांसारख्या तणावपूर्ण जीवनशैली असलेल्या लोकांना MCTs आणि केटोन्स तणाव आणि चिंतापासून आराम देतात आणि शांत झोप लागते.

  • आप्रोस व्हीसीओ मधील पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात. सांधेदुखी आणि संधिवात यावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव जाणवतो.

  • आप्रोस व्हीसीओ अतिशय हलके असल्याने त्वचेत सहजच खोलवर जिरते आणि दीर्घकाळ टिकणारी आर्द्रता मिळून चेहरा तजेलदार होतो. बुरशी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म नैसर्गिक स्पर्श आणि रंग प्रदान करतात व त्वचा आणि केसांचे आरोग्य वाढवतात.

  • लहान मुलांप्रमाणेच, आप्रोस व्हीसीओ हे प्रसूतीनंतरच्या मातांची शारिरीक झीज भरून काढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट औषधी तेल आहे.

  • आप्रोस 3 वर्षांपेक्षा लहान मुलांना तोंडी देऊ नये. ३ वर्षांपेंक्षा लहान मुलांसाठी हे फक्त मसाजसाठी आहे. हे लहान मुलांना मसाज करण्यासाठी सर्वोत्तम औषधी तेल आहे. हे त्वचा आणि टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि लहान मुलांची हाडे आणि स्नायू मजबूत करते. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. ह्याचे बुरशी रोधक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म लहान मुलांभोवती एक संरक्षणात्मक कवच बनवतात व पुरळ, चट्टे इ. चा कायमस्वरूपी बंदोबस्त करतात.. मुलांना शांत झोप मिळते त्यामुळे त्यांची सर्वांगीण वाढ पूर्ण होते.

  • आप्रोस दररोज १५ ML ( दोन चमचे ) प्राशन केल्याने आपल्या व्याधींवर लवकर गुण येतो.

Leave a Comment

Your email address will not be published.